मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 10 रुपयात पोटभर जेवण ही योजना अंमलात अणली असून त्याबाबत शासन निर्णयही काढण्यात आला आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आणि महापालिका क्षेत्रात सध्या एक-एक थाळी केंद्र सुरु करण्यात येत आहे. या जीआरमध्ये जिल्हानिहाय देण्यात येणाऱ्या थाळींची आकडेवारी दिलेली आहे. यामध्ये मुंबई शहर आणि उपनगरसाठी केवळ 1950 थाळींची तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणजे मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये दिवसाला 1950 शिवभोजन थाळ्या दिल्या जाणरा आहेत.

 

मात्र शिवभोजन थाळी दुपारी 12 ते 2 एवढ्याच कालावधीमध्ये उपलब्ध असणार असून थाळीच्या योजनेमध्ये विविध अटी घालण्यात आल्या आहेत. यावर भाजपाचे नेते निलेश राणे यांनी थाळीच्या अटी बघून भूक मरेल अशी प्रतिक्रिया देत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. थाळीवर घालण्यात आलेल्या अटी बघूनच भूक मरेल. तसेच शिवभोजन नाव बदलून अटीभोजन करा असा टोला देखील निलेश राणेंनी शिवसेनेवर लगावला आहे. त्याचप्रकारे सरकारकडून सरळ हाताने काय मिळेल अशी अपेक्षा करु नका असं देखील निलशे राणे यांनी म्हटले आहे.                                                                                               

 

 

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: