देशभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. देशातील एकूण रुग्ण संख्या ही 96 हजारां पार पोहोचली आहे. 24 तासात कोरोनाचे 5 हजारपेक्षा जास्त नवीन रुग्ण समोर आले आहेत.

 

आरोग्य मंत्रालयाकडून सोमवारी सकाळी ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. आता देशातील एकूण कंफर्म केसेसची संख्या ही 96 हजार 169 एवढी झाली आहे. यामधील 3 हजार 49 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 36 हजारांपेक्षा जास्त रुग्ण हे बरे झाले आहेत.


सध्या देशभरात 56 हजार 316 अॅक्टिव्ह केस आहेत. महाराष्ट्रात कोरोनामुळे सर्वात जास्त लोकांना बाधा झाली आहे. येथे रुग्णांची संख्या ही 33 हजारांपार पोहोचली आहे.

 

तर मृतांची संख्या ही 1198 एवढी आहे. तर गुजरातमध्ये कोरोना पीडितांचा आकडा हा 11 हजार 376 पर्यंत पोहोचला आहे. तर मृतांचा आकडा हा 659 वर गेला आहे.


तर तामिळनाडुमध्येही झपाट्याने कोरोना रुग्ण वाढत आहेत. आतापर्यंत येथे 11 हजार 224 केस समोर आल्या आहेत. यामध्ये 78 लोकांचा मृत्यू झाला आहे.

 

तर दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा हा 10 हजार पार गेला आहे. मंत्रालयाच्या अफडेट नुसार दिल्लीमध्ये एकूण रुग्णांची संख्या ही 10 हजार 54 एवढी आहे. यामध्ये 160 लोकांचा मृत्यू झाला आहे.

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: