नुकतेच दिशा पटानी आणि आदित्य रॉय कपूर यांची मुख्य भूमिका असलेल्या आगामी मलंग चित्रपटाचे टायटल ट्रॅक रिलीज करण्यात आले आहे. दिशा आणि आदित्य यांच्यातील सुंदर केमिस्ट्री या गाण्यात पाहायला मिळत आहे. त्याचसोबत, गाण्याचे बोल आणि संगीत याची उत्तम सांगड असल्याने हे टायटल ट्रॅक खुपच सुंदर झाले आहे.
प्रेक्षकांमध्ये मलंग चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यापासूनच या चित्रपटाच्या कथानकाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर दिशा आणि आदित्यची फ्रेश जोडी चित्रपटातील रोमँटिक गाण्यांमध्ये तर दिसतेच पण आता या जोडीला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते देखील खूपच उत्सुक आहेत.
एकमेकांना शोधत असलेल्या दोन व्यक्तींची झलक मलंगचा टायटल ट्रॅकमध्ये दिसते. हे गीत कुणाल वर्मा आणि हर्ष लिंबाचिया यांनी लिहिले आहे, तर हे गाणे वेद शर्मा यांनी संगीतबद्ध करून या गाण्याला आपला आवाज दिला आहे. चित्रपटातील इतर गाणी प्रेक्षकांमध्ये बरीच लोकप्रिय होत आहेत.
मलंगची सोशल मीडियावर देखील चाहत्यांमध्ये भरभरून चर्चा होताना दिसत आहे. दरम्यान, आदित्य रॉय कपूर आणि दिशा पटानी यांच्यासह या चित्रपटात अनिल कपूर आणि कुणाल खेमूदेखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. लव्ह फिल्म्स आणि टी-सीरिजच्या बॅनरखाली तयार केलेला हा चित्रपट पुढच्या महिन्यात रिलीज होणार आहे.
click and follow Indiaherald WhatsApp channel