भीमा कोरेगाव दंगल प्रकरणातील आरोपी संभाजी उर्फ मनोहर भिडे आणि इतर आरोपी विरोधातील तपास लवकरात लवकर पूर्ण करून 11 नोव्हेंबर पर्यंत सर्व आरोपींच्या विरोधात आरोपपत्र दाखल करावे असे आदेश आज मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती रणजित मोरे यांनी आज दिले आहेत.
भीमा कोरेगाव येथे 1 जानेवारी 2018 रोजी दंगल झाली होती. या दंगल प्रकरणात अनिता साळवे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात मिलिंद एकबोटे, मनोहर भिडे आदी आरोपी आहेत. एकबोटे याच्यावर कारवाई झाली आहे. त्याला अटक झाली आहे.
काही महिने तो जेलमध्ये होता. मात्र मनोहर भिडे यांच्यावर अजून कोणतीच कारवाई झालेली नाही. यामुळे मनोहर भिडे यांच्यावर कारवाई व्हावी या मागणीसाठी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल आहे.
या याचिकेची दाखल घेऊन कोर्टाने एप्रिल 2019 रोजी पुणे ग्रामीण पोलीस, राज्य सरकार यांना नोटीस काढून त्यांचं म्हणणं मांडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार 16 जून 2019 रोजी पुणे ग्रामीण पोलिसांनी आपण या प्रकरणात करवाई करणार आहोत.
तपास सुरू आहे, अशी माहिती कोर्टाला दिली होती. यावेळी कोर्टाने 'तुम्हाला तपास पूर्ण करायला कीती वेळ लागणार आहे ? तुम्हीं कधी आरोपपत्र दाखल करणार ?' अशी विचारणा केली.
click and follow Indiaherald WhatsApp channel