मुंबई – राज्यसभेच्या महाराष्ट्राच्या सात जागा येत्या २६ मार्च रोजी रिक्त होणार असून त्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे २ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि माजी मंत्री फौजीया खान यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. एप्रिल महिन्यात शरद पवार यांचा राज्यसभेचा कार्यकाळ पूर्ण होणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभेतील सदस्य माजिद मेमन यांचा कार्यकाळही पूर्ण होणार आहे. यावेळी फौजिया खान यांना त्यांच्या जागी संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्राच्या राज्यसभेतील सात जागा रिक्त होणार आहेत. महाविकास आघाडीच्या यापैकी चार जागा आहेत. त्यापैकी २ राष्ट्रवादी काँग्रेस, एक काँग्रेस आणि एक जागा शिवसेनेची आहे. आपली दोन नावे राष्ट्रवादी काँग्रेसने निश्चित केली आहेत. पण काँग्रेस आणि शिवसेनेने आपल्या नावांची घोषणा केली नाही. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पहिल्यांदाच राज्यसभेची निवडणूक एकत्रित लढवणार आहेत.
click and follow Indiaherald WhatsApp channel