सिंधुदुर्ग : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजपासून दोन दिवसाच्या कोकण दौऱ्यावर येत आहेत. रायगड, रत्नागिरी आणि त्यानंतर ते सिंधुदुर्गला जाणार आहेत. सकाळी रायगड दौऱ्यानंतर ते रत्नागिरील्या गणपतीपुळे इथे दाखल होणार आहेत. गणपतीपुळेत आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुरुवातीला श्रींचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर विकास आराखड्यातील प्रमुख कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.
याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या कोकण दौऱ्यावर टीका केली आहे. ते याबाबत मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ‘उद्धव ठाकरेंचा कोकण दौरा नसून पर्यटन दौरा आहे,’ असा टोला त्यांनी येथे बोलताना लगावला.
पुढे बोलताना राणे म्हणाले, ‘अवकाळी पावसाची नुकसान भरपाई अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे जे करायचं ते केलं नसल्याचं म्हणत राणेंनी नाराजी व्यक्त केली. ‘तुमचं सरकार तुम्ही चालवा पण, कोकणी जनतेला शांतपणे जगू द्या, असे आमदार नितेश राणे म्हणाले.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गणपतीपुळे पर्यटन विकासासाठी मंजुर झालेल्या सुमारे 102 कोटींचा विकासकामांमधील प्रमुख कामांचे भूमीपूजन करण्यात येणार आहे. तसेच गणपतीपुळे येथील आठवडाबाजार मैदानात मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा होणार आहे. दरम्यान या दौऱ्यादरम्यन उद्धव ठाकरे नाणारवर काय बोलणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय.
click and follow Indiaherald WhatsApp channel