नवी दिल्ली: आयएनएक्स मीडिया प्रकरणी माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांना सीबीआयने ताब्यात घेतले आहे. चिदंबरम यांना अखेर २८ तासांनंतर ताब्यात घेण्यात आलं आहे. सीबीआय पथकाने तब्बल दीड तास चिदंबरम यांची कसून चौकशी केली आणि त्यानंतर त्यांना ताब्यात घेतले.

चिदंबरम यांनी काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषद घेत आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले. त्यानंतर चिदंबरम घरी गेले. सीबीआयला याची माहिती मिळताच. सीबीआयटीमने त्यांचे निवासस्थान गाठले आणि गेटवरून उड्या मारून आतमध्ये प्रवेश केला. चिदंबरम यांची तब्ब्ल दीड तास चौकशी करण्यात आली. घरापुढे काँग्रेस कार्यकर्त्यांचा जमाव असल्यानी सीबीआयने दिल्ली पोलिसांना बोलावले आणि जमावाला पांगवून चिदंबरम यांना ताब्यात घेतले.

चिदंबरम यांना दिल्ली उच्च न्यायालयानंतर सर्वोच्च न्यायालयानेही तात्काळ दिलासा देण्यास नकार दिला होता. याशिवाय अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) चिदंबरम यांच्याविरुद्ध लुकआऊट नोटीस जारी केली होती.

दिल्ली उच्च न्यायालयाने झटका दिल्यानंतर पी. चिदंबरम सर्वोच्च न्यायालयात पोहोचले होते. परंतु, सर्वोच्च न्यायायालयाचे न्या. एन. व्ही. रामणा यांनी या प्रकरणावर निर्णय देण्यास नकार देत याबाबत तुम्ही सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यासमोर दाद मागावी, असा सल्ला चिदंबरम यांच्या वकीलांना दिला होता.                                               


మరింత సమాచారం తెలుసుకోండి: