
मुंबईतील नालेसफाईच्या कामात प्रचंड भ्रष्टाचार झाल्याने मुंबई पाण्याखाली गेली, असा आरोप करत यासंदर्भात संसदीय संयुक्त समिती द्वारे चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सभागृहात केली.
मुंबईत गेल्या तीन-चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. हवामान विभागानं अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. मुंबईत जागोजागी पाणी तुंबले आहे. यामुद्यावरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला.
याचदरम्यान मुंबईतील नालेसफाईच्या कामात प्रचंड भ्रष्टाचार झाल्याने मुंबई पाण्याखाली गेली. बिल्डर आपल्या फायद्यासाठी बीएमसीच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरुन नाल्यावर अतिक्रमणे करतात, असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला.
इतकेच नव्हे तर परंतु त्यावर कारवाई होत नाही त्यामुळे यासंदर्भात संसदीय संयुक्त समिती द्वारे चौकशी करण्यात यावी अशी मागणी मुंडे यांनी केली. सध्या विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. विरोधकांनी सरकावर जोरदार निशाणा साधला आहे.