बल्ड प्रेशर किती आहे हे जाणून घेण्यासाठी आता तुम्हाला डॉक्टरांची गरज नाही. टोरंटो युनिवर्सिटीच्या संशोधकांनी मोबाईल फोनच्या कँमेऱ्याद्वारे बल्ड प्रेशर जाणून घेण्याचे तंत्र विकसित केले आहे. सेल्फी व्हिडीओच्या मदतीने आता बल्ड प्रेशरची माहिती मिळणार आहे. संशोधकांनुसार, चीन आणि कँनेडाच्या 1328 लोकांवर परिक्षणादरम्यान 95 टक्के अचूक ब्लड प्रेशरची माहिती मिळाली.

टोरंटो युनिवर्सिटीचे संशोधक पॉल झेंग यांनी ट्रांसडर्मल ऑप्टिकल इमेजिंग तंत्रज्ञानाद्वारे ही टेक्नोलॉजी विकसित केली. या तंत्रज्ञानाच्या मदतीने चेहऱ्याच्या त्वचेद्वारे ब्ल्ड प्रेशरची माहिती मिळेल. संशोधकांनी हे समजण्यासाठी दोन मिनिटांच्या सेल्फी व्हिडीओचा वापर केला आहे.

व्हिडीओ बनवताना, मोबाईल कँमेऱ्यामध्ये लागलेले ऑप्टिक्ल सेंसर चेहऱ्यावर पडणारे लाल किरण कँप्चर करतात. हे किरण त्वचेच्या खाली असलेल्या हीमोग्लोबिनमुळे रिप्लेक्ट होतात. ट्रांसमर्डल ऑप्टिक्ल इमेजिंग टेक्नोलॉजी या परावर्तित किरणांच्या मदतीने शरीरातील रक्ताच्या दबावाची माहिती देते.

संशोधकांनुसार, ट्रांसमर्डल ऑप्टिक्ल इमेजिंग जगभरात वाढणाऱ्या हायपरटेंशन (हाय बीपी) कमी करण्यास मदत करेल. खास करून अशा ठिकाणी जेथे आरोग्य सेवा सहज उपलब्ध नसतात. जर तुमच्याकडे फोन अथवा कॉम्प्युटर असेल तर माहिती मिळताच तुम्ही डॉक्टरांशी बोलू शकता. यामुळे लोकांमधील जागृकता वाढेल.

टेक कंपनी न्यूरालॉजिक्सने एनुरा नावाचे अँप लाँच केले आहे. हे अँप 30 मिनिटांच्या सेल्फी व्हिडीओद्वारे ह्रदयाचे ठोके आणि दबाब याचा स्तर सांगेल. कंपनी लवकरच या अँपमध्ये बल्ड प्रेशरची माहिती देणारे फिचर लाँच करणार असून, जे सुरूवातीला केवळ चीनमध्ये सुरू करण्यात येईल. कंपनीचे संस्थापक ली यांचे म्हणणे आहे की, युजर्सच्या आरोग्याची माहिती देणारे आकडे अँप क्लाउडवर अपलोड केले जातील. लवकरच याच्या मदतीने कॉलेस्ट्रॉल, हिमोग्लोबीन आणि ब्लड ग्लोकज लेवलची माहिती देखील मिळेल.



మరింత సమాచారం తెలుసుకోండి: