मुंबई – राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात ३० एप्रिलपर्यंत लॉकडाउन कायम राहणार असल्याची घोषणा केली. फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून त्यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधताना, कोणत्याही उलटसुलट बातम्या येण्याऐवजी मी तुम्हाला ही माहिती देतो आहे. आजपर्यंत जे धैर्य दाखवले तसेच यापुढेही दाखवा, असेही उद्धव ठाकरे म्हटले आहेत.
कोरोनाग्रस्तांची महाराष्ट्रातील संख्या वाढली, हे आहे. पुण्यात सुरुवात झाली, मुंबईत रुग्ण वाढले आहेत. कारण मुंबई हे जगाचे प्रवेशद्वार आहे. आपण जेव्हा या रोगाच्या तपासण्या सुरु केल्या, तेव्हा केंद्राकडून आलेल्या यादीतील देशांना बंदी होती. पण यादीत जे देश नव्हते त्यातील रुग्ण राज्यात मिसळले.
आता मुंबईत ज्या ज्या ठिकाणी रुग्ण आढळले आहेत, ते भाग सील केले आहेत. आपल्याला जे रुग्ण सापडले आहेत, त्यांची तपासणी महापालिका घरोघरी जाऊन करत आहे. आता रुग्ण समोरुन येण्याची वाट बघत नाही, तर घरी जाऊन चाचण्या करतो आहोत. मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या १ हजारांवर गेली आहे.
दुर्दैवाने कोरोनामुळे ज्यांचा मृत्यू झाला आहे, ती संख्या देखील वाढत आहे. ज्यांचे वय जास्त आहे त्यांना धोका वाढतो आहे. ज्यांना आधीपासून काही विकार आहेत अशा रुग्णांवर कोरोनाचा गंभीर परिणाम होतो आहे. त्याचबरोबर येत्या 14 एप्रिलला पुढील लॉकडाऊनची रुपरेषा सांगणार असल्याचा उल्लेख त्यांनी आवर्जुन केला.
click and follow Indiaherald WhatsApp channel