केंद्र सरकारने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात पुन्हा दोन आठवड्यासाठी लॉकडाऊन जाहीर केला आहे. देशात त्यानुसार 4 मे पासून 17 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. दरम्यान, ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील नागरिकांना लॉकडाऊन दरम्यान काही सवलती मिळण्याची चिन्हे आहेत.
आज मंत्रीमंडळातील काही मंत्र्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 मे नंतरच्या परिस्थिती विषयी चर्चा केली. त्यानंतर मोदी सरकारने आणखी दोन आठवड्यांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. या संदर्भातील वृत्त एएनआय वृत्तसंस्थेने दिले असून त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा लॉकडाऊन 17 मे पर्यंत कायम राहणार आहे.
click and follow Indiaherald WhatsApp channel