भारताचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी मागील अनेक दिवसांपासून विविध कारणांनी चर्चेत येत आहे. सध्या त्याचा एक जूने हिंदी गाणे गातानाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
साक्षी धोनीची मैत्रीण प्रीती सिमोसने एमएस धोनीच्या गाण्याचा हा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. काही दिवसांपूर्वी धोनीच्या घरी त्याचे काही मित्र-मैत्रीणी आले होते. त्या दरम्यानचा हा व्हिडिओ असण्याची शक्यता आहे. या व्हिडिओमध्ये धोनी ‘जब कोई बात बिगड़ जाए’ हे जूने हिंदी गाणे म्हणताना दिसत आहे.
धोनी मागील अनेक महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. त्याने त्याचा शेवटचा सामना 2019 विश्वचषकात न्यूझीलंड विरुद्ध खेळला आहे. त्यामुळे त्याच्या भविष्याबाबत सातत्याने भारतीय क्रिकेट वर्तुळात चर्चा होत आहे. पण काही दिवसांपूर्वीच धोनीने जानेवारीपर्यंत त्याला याबबात काहीही विचारू नका असे म्हटले होते.
https://www.instagram.com/p/B5pFCVtpR2J/?utm_source=ig_web_copy_link
click and follow Indiaherald WhatsApp channel