टपाल खात्याच्या फिलाटेली क्लब अंतर्गत दिनदयाळ स्पर्श योजना या शिष्यवृत्तीचा लाभ इयत्ता सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी घ्यावा, असं आवाहन टपाल खात्यातर्फे करण्यात आले आहे. या योजनेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांनी टपाल खात्याचा पन्नास गुणांचा पेपर सोडवायचा आहे. त्यात उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्षाला सहा हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. केंद्र सरकारने विद्यार्थ्यांसाठी टपाल खात्यामार्फत ही शिष्यवृत्ती सुरू केली आहे.

पुण्यातील जनरल पोस्ट ऑफीस इथं २७ ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांनी अर्ज करायचे आहेत. तिकीट संग्रहाच्या छंदातून व्यक्तिमत्त्व विकास, सामान्य ज्ञानाची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी; त्यांचा हसत खेळत अभ्यासही व्हावा आणि लहान वयातच स्पर्धा परीक्षांचा पाया देखील पक्का व्हावा या उद्देशाने केंद्र सरकारने ही शिष्यवृत्ती सुरू केली आहे, अशी माहिती जीपीओचे वरीष्ठ पोस्ट मास्तर एऩ.आर. शेडगे यांनी दिली.

शेडगे म्हणाले की, या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी फिलाटेली ठेव खाते बनवावे लागते. तो विद्यार्थी किंवा विद्यार्थीनी त्याच्या शाळेतील फिलाटेली क्लबचे सदस्य असावेत. एका वर्षासाठी ही शिष्यवृत्ती आहे. भविष्यात याच विद्यार्थ्यांमधून संशोधक, शास्त्रज्ञ घडू शकतात, त्यामुळे केंद्र सरकारने टपाल खात्यामार्फत ही शिष्यवृत्ती सुरू केली आहे

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: