भोर- भोर उपजिल्हा रुग्णालयातील “सरकारी’कारभारामुळे सर्पदंश झालेल्या चिमकुलीचा मृत्यू झाला. रूग्णालयात वेळेत दाखल करूनही केवळ सर्पदंशावरील लसच उपलब्ध नसल्याचे उशीरा समजल्याने चिमकुलीला जीव गमवावा लागला. रुग्णालय अधिक्षकांचे त्यांच्या कामात दुर्लक्ष असल्यानेच कु. प्रगती हिला प्राण गमवावे लागले असल्याचे तिचे चुलते देवा मसुरकर व वडील मारुती मसुरकर यांनी सांगितले. उपजिल्हा रुग्णालयातील संबंधित आधिकाऱ्याची चौकशी करुन त्याच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, चार वर्षीय चिमुकली प्रगती मारुती मसुरकर (वय 4, रा.म्हसर बु.) हिला शनिवार (दि. 10) रात्री 12 वाजण्याच्या सुमारास सर्व कुटुंबीय गाढ झोपेत असताना सर्पदंश झाला.तीला भोरच्या रामबाग येथील शासनाच्या उप जिल्हा रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले त्यानंतर तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी प्रगती हिच्यावर प्रथमोचारही केले. मात्र, दिड तासानंतर तीच्या पालकांना रुग्णालयात संर्पदंशाची लसच उपलब्ध नसल्याचे व तीला पुणे येथील ससुन रुग्णालयात नेण्यास पालकांना सांगण्यात आले. कु. प्रतीला तेथे नेण्याय दोन तास लागले. ससुन रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच प्रगती हिचा मृत्यू झाला असल्याचे तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी सांगितले.

भोर, तालुक्‍यात अतिवृष्टी होत आसल्याने सर्वत्र दलदल असून विषारी सर्प आणि इतर विषारी जीव घरात शिरत असल्याने नागरिकांना दंश होण्याची प्रमाण वाढले आहे. भोरच्या अपत्कालिन व्यवस्थेमार्फत सर्व प्रकारची दक्षता घेतली जात असताना भोरच्या उप जिल्हा रुग्णालयात मात्र लसी उपलब्ध नसल्याने रूग्णांकडून संताप व्यक्त केला जात आहे.


మరింత సమాచారం తెలుసుకోండి: