सिंधुदुर्ग नगरपालिकेचे नगराध्यक्ष आणि शिवसेनेचे नेते बबन साळगावकर यांनी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्यावर घणाघाती आरोप केले आहेत. त्यांनी दीपक केसरकर हे जादूगार आहेत. करणी करुन त्यांनी नारायण राणेंचा पक्ष प्रवेश अडकवला आहे. त्यांनी अनेकांचे राजकीय आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे असं विधान केले आहे. त्यामुळे कोकणात शिवसेनेत फुट पडली आहे.

दरम्यान दीपक केसरकर यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. साळगावकर यांचे आरोप हास्यास्पद आहेत. त्यांना आमदारकीची स्वप्न पडत असल्याने हे आरोप करत असल्याचं केसरकर यांनी सांगितलं आहे. आतापर्यंत मी बबन साळगावकर यांना माझा राजकीय वारस म्हणत होतो. मात्र अशा आरोपांमुळे यापुढे माझे ते राजकीय वारसदार नसतील असंही त्यांनी म्हटले आहे.

पुढे बोलताना त्यांनी नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशावर भाष्य केले आहे. त्यांनी ‘शिवसेनेचा नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाला ठाम विरोध आहे. जोपर्यंत उद्धव ठाकरे आणि दीपक केसरकर आहेत, तोपर्यंत राणेंचा भाजप प्रवेश होणार नाही असं म्हटले आहे त्यामुळे नारायण राणे यांचा भाजप प्रवेश आता स्थगित होण्याच्या मार्गावर असल्याच चित्र आहे.

दरम्यान, भाजपचे सहयोगी खासदार असलेलेल नारायण राणे हे भाजपमध्ये प्रवेश करण्यास उत्सुक आहेत. परंतु शिवसेना त्यांच्या भाजप प्रवेशाला करत आहे. त्यामुळे राणे यांचा भाजप प्रवेश रखडलेला आहे. त्यामुळे राणे भविष्यात नेमकी काय भूमिका घेतात हे पाहन महत्वाचं ठरणार आहे.


మరింత సమాచారం తెలుసుకోండి: