बॉलीवूड मधला परफेक्शनिस्ट कलाकार आमीर खान त्याच्या आगामी लालसिंग चढ्ढा चित्रपटाच्या शुटींग निमित्ताने सध्या पंजाब मध्ये मुक्काम ठोकून आहे. शनिवारी त्याने अचानक शीख धर्मियांचे पवित्र स्थळ सुवर्णमंदिर येथे भेट देऊन माथा टेकून गुरु ग्रंथसाहिबांचे आशीर्वाद घेतले.
आमीर खान आल्याचे समजताच येथे दर्शनासाठी आलेल्या आमीरच्या चाहत्यांनी त्याला पाहण्यासाठी एकाच गर्दी केली. आमीर खानने त्याच्या लालसिंग चढ्ढा चित्रपटातील फर्स्ट लुक सोशल मीडियावर नुकताच शेअर केला आहे. फोटो सोबत कॅप्शन लिहिताना त्याने सत श्री अकालजी, मैं लालसिंग चढ्ढा असे लिहिले आहे.
हा चित्रपट हॉलीवूड स्टार टॉम हॅकच्या फॉरेस्ट गॅप या ऑस्कर विजेत्या चित्रपटाचा हिंदी रिमेक असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या चित्रपटासाठी आमीर खूप मेहनत घेतो आहे. हा चित्रपट २०२० च्या नाताळमध्ये प्रदर्शित होईल. त्यात आमीर सोबत करीना कपूर असून या जोडीचा थ्री इडियट्स चित्रपट खुपच गाजला होता.
click and follow Indiaherald WhatsApp channel