पुणे : संभाजी ब्रिगेडने चला हवा ये द्या या कार्यक्रमाचा सुत्रसंचालक निलेश साबळे आणि अभिनेते भाऊ कदम, कुशल बद्रिके या तिन्ही कलाकारांविरोधात पोलिसात तक्रार दिली आहे. हे कलाकार ‘चला हवा येऊ द्या’ या विनोदी शो मधून घराघरात पोहचले आहेत. पण सोलापुरात त्यांच्याविरोधात या तिघांनी धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत तक्रार करण्यात आली आहे.
पोलीस ठाण्यात संभाजी ब्रिगेडच्या वतीने फिर्याद नोंदवण्यात आल्यामुळे या तिन्ही कलाकारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. संभाजी ब्रिगेडने राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड या महापुरुषांची नक्कल करुन विनोद केल्याचा आरोप केला आहे. याच प्रकरणी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी निलेश साबळेंनी माफी मागावी, असे म्हटले होते. दरम्यान, निलेश साबळे यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत दिलगिरी व्यक्त केली आहे.
click and follow Indiaherald WhatsApp channel