सगळ्या गोष्टीचं सोंग करता येतं, पण पैशाचं सोंग करता येत नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले. कोविड रोखण्यासाठी महाराष्ट्राने ज्यापद्धतीने आरोग्य सेवा उभ्या केल्या तशा आरोग्य सेवा देशातील एकाही राज्यात निर्माण झाल्या नसतील, असा दावा उद्धव ठाकरेंनी केलाय.
फडणवीस यांनी केलेल्या टीकेवरून मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारण्यात आला. फडणवीस यांनी केलेल्या टीकेकडे कसं बघता. त्यावर उत्तर देताना ठाकरे म्हणाले, याकडे बघायला मला वेळच नाही. शेतकरी आणि माझी जनता यांच्याकडे माझे लक्ष असल्यानंतर, हे चिल्लर… थिल्लर, जे काही असेल त्याकडे बघायला मला वेळ नाही.
click and follow Indiaherald WhatsApp channel