हिंगोली : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होतांना दिसून येत आहे. आज परत कोरोनाचे 6 नवीन रुग्ण आढळून आल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या सहा रुग्णांमध्ये एसआरपीएफच्या 5 जवानांचाही समावेश असल्याची माहिती मिळत आहे.
तर एक व्यक्ती सेनगाव येथील रहिवासी आहे. काल जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 47 वर होती मात्र आज आढळून आलेल्या सहा रुग्णांमुळं जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा आता 53 वर गेला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासन सतर्क झाले असून नागरिकांनी घराबाहेर पडू नये अशा सुचना देण्यात आल्या आहेत.
click and follow Indiaherald WhatsApp channel