सध्या आपल्या ‘पंगा’ या चित्रपटामुळे बॉलिवूडची क्वीन कंगना राणावत चर्चेत आहे. प्रेक्षक आणि समिक्षकांचा नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘पंगा’ला मिश्र प्रतिसाद मिळत असून एका महिला कबड्डीपटूच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. कंगना गेल्या काही काळात प्रामुख्याने महिला प्रधान चित्रपटांना प्राधान्य देताना दिसत आहे. तिचा येत्या काळात आणखी एक महिला प्रधान चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘तेजस’ असे या आगामी चित्रपटाचे नाव असून कंगना या चित्रपटामध्ये भारतीय बनावटीच्या ‘तेजस’ या लढाऊ विमानाच्या वैमानिकाची भूमिका साकारणार आहे. सध्या या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु आहे. प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक सर्वेश मेवरा तेजसचे दिग्दर्शन करत आहेत. तर रॉनी स्क्रूवाला यांनी निर्मितीची जबाबदारी स्विकारली आहे.
मला गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय सैन्यावर आधारित चित्रपटामध्ये काम करण्याची इच्छा होती. पण अद्याप माझ्या वाट्याला अशा प्रकारचा कुठलाही चित्रपट आलेला नव्हता. परंतु माझी ती इच्छा ‘तेजस’ या चित्रपटामुळे पूर्ण झाली. या चित्रपटावर आम्ही जीव तोडून मेहनत करत आहोत आणि तुम्हाला पंगा या चित्रपटाप्रमाणे तेजस देखील आवडेल अशी मला खात्री असल्याचे म्हणत कंगनाने आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली. येत्या जुलै महिन्यात ‘तेसज’ रिलीज होणार आहे.
click and follow Indiaherald WhatsApp channel