बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूर उर्फ बेबोने सोशल मिडियावर एन्ट्री करत असल्याचे संकेत दिले असून इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहेत. त्यात एक काळे मांजर पळताना दिसते आहे. त्याच्यापाठोपाठ कमिंग सून अशी अक्षरे दिसत आहेत आणि कॅप्शन मध्येही हीच अक्षरे दिसत आहेत.
करीनाने तिच्या अभिनयाने जगभर चाहते निर्माण केले आहेत. मात्र आजकाल सर्वाधिक वेगाने लोकप्रिय होण्याचे साधन बनलेल्या सोशल मिडियापासून ती दूर राहिली होती. त्यामुळे सोशल मिडियावरील तिची अनुपस्थिती तिच्या चाहत्यांना खुपच जाणवत होती. त्यांच्यासाठी ही चांगली बातमी आहे.
बॉलीवूड मधील अनेक तारेतारका सोशल मिडियावर सक्रीय आहेत मात्र रणबीरकपूर, सैफअली खान, करीना, कंगना रानौत सोशल मिडियापासून दूर आहेत. आता करीनाने इन्स्टाग्रामवर एन्ट्री करताच चाहत्यांनी तिचे स्वागत केले आहे आणि काही वेळातच तिला ६० हजार फॉलोअर्स मिळाले आहेत. बेबोने अजूनतरी कुणालाही फॉलो केलेले नाही. तिने तिचे प्रोफाईल पिक्चरही दिलेले नाही.
कामाच्या आघाडीबाबत बोलायचे तर करीनाचा आमीर खान सोबतचा लालसिंग चढ्ढा लवकरच येत असून या संदर्भातले तिचे फोटो सतत व्हायरल होत आहेत. इरफान बरोबरच्या तिच्या इंग्लिश मिडीयमचे ट्रेलर जारी झाले आणि आणि प्रेक्षकांची त्याला पसंती मिळाली आहे.
click and follow Indiaherald WhatsApp channel