देशात पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकार केंद्रात सत्तेवर आल्यानंतर सामाजिक असहिष्णुता आणि झुंडबळी (मॉब लिंचिंग) वाढले आहेत. याचे कारण म्हणजे समाजाच्या विविध घटकांमध्ये मोठी जातीय तेढ निर्माण होत आहे, अशा शब्दांत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. भारताचे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांना 75 व्या जयंतीनिमित्त त्यांनी आज श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

राजीव गांधी हे शांती, ऐक्‍य आणि धार्मिक सलोखा वाढावा यासाठी सतत प्रोत्साहन देत असत. कोणत्याही एका समाजासाठी अथवा विरोधात त्यांनी आपले निर्णय घेतले नाहीत. त्यामुळे आजच्या राजकीय परिस्थितीत आपल्याला त्यांच्याच मार्गानं चालायला हवं. देशातील काही प्रवृत्तींमुळं धार्मिक ध्रुवीकरण वाढले असून आणि हिंसेच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. द्वेष पसरवणाऱ्या काही संघटना हे काम करत आहेत. जमाव कायदा हातात घेत आहे. त्यामुळं आपल्या समजाचं नुकसान होत आहे, असंही, असंही सिंग म्हणाले.

“संपूर्ण भारत देश हा अविभाज्य असून धर्मनिरपेक्षता राष्ट्रवादाचा आधार आहे. कोणताच धर्म द्वेष आणि असहिष्णुतेची शिकवण देत नाही. बाहेरील आणि अंतर्गत काही असंतुष्ट शक्ती स्वार्थापोटी भारताचे विभाजन करण्यासाठी धार्मिक कट्टरता आणि हिंसा भडकवण्याचे काम करत आहेत. सरकारने अशा प्रवृत्तींना खतपाणी न घालता, त्यांच्यावर कारवाई करायला हवी आहे. 

– डॉ. मनमोहन सिंग, माजी पंतप्रधान

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: