करोना मुळे सगळी कडे लॉकडाऊन झालं आहे.त्यामुळे बरेच लोकं आपल्याला हव्या त्या कामात स्वतःला गुंतवून ठेवत आहेत. तर काही लोकं याचा वेगळा आनंद घेत आहेत. चारू असोपा सेन आणि राजीव सेन हे सेलिब्रिटी कपल लॉक डाऊन मुळे एकमेकांना चांगलेच वेळ देत आहेत.
त्याच बरोबर आपण काय करतोय याची माहिती सुद्धा ते सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांना देत आहेत.पण कधी – कधी वेळ काय आणि आपण करतोय काय ? हे कळत नाही. आणि आपण टीकेचे धनी होऊन बसतो. असाच प्रकार या कपलच्या बाबतीत झाला.
त्यात राजीवने चारुबरोबरच्या वाईन डेटचे फोटो पोस्ट केले होते. या सेल्फी फोटोंमध्ये हे दोघे एकमेंचे चुंबन घेताना दिसत आहेत. “आम्ही क्वारंटनाइनच्या या दिवसांच्या प्रेमात आहोत. तुम्हीही आहात का?” अशी कॅप्शन या फोटोंना राजीवने दिली होती. या फोटोवर कमेंट करताना चारुने “क्वारंटाइनमध्ये आम्ही आनंदात आहोत. घरी राहा. सुरक्षित राहा.” असं म्हटलं होतं.
पण या पोस्ट चाहत्यांना अतिशय खासगी प्रकाराच्या वाटल्या. अनेकांनी नाराजी व्यक्त करत कमेंट केल्या तर काहींनी मोलाचे सल्ले दिले. आपण काय करतोय याचा जरा तरी भान ठेऊन विचार करून असले काही फोटो शेयर करत जा. यामुळे राजीव आणि चारू सेन चांगलेच ट्रोल झाले आहेत.
click and follow Indiaherald WhatsApp channel