टीम महाराष्ट्र देशा – कोरोना व्हायरसचा राज्यात फैलाव वाढू नये तसेच राज्य  शासनाकडून घेण्यात येत असलेल्या उपाय योजनांचा आढावा आज मुंबईमधील मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यात त्यांनी बैठकी बद्दल माहिती दिली.

 

आता मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत ट्वीटर कारून माहिती दिली आहे ज्यात त्यांनी नागरिकांना आवाहनही केलं आहे.  मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज कोरोना संदर्भात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी खालील मुद्दे मांडले. आजदेखील आम्ही बस किंवा ट्रेन बंद करण्याचा निर्णय घेतलेला नाही, पण माझं आवाहन आहे की अनावश्यक प्रवास टाळला पाहिजे, गरज नसेल तर घराबाहेर पडू नका – मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे

 

बस आणि ट्रेन या अत्यावश्यक सेवा आहेत आणि अत्यावश्यक सेवा बंद करू नये अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. ज्यांना अत्यावश्यक प्रवास असेल त्यांनीच त्याच्यात प्रवास करावा, अनावश्यक प्रवास टाळावा, कामाशिवाय घराबाहेर पडू नये या प्राथमिक सूचना आहेत.

 

सरकारी कर्मचाऱ्यांना एक आठवड्याची सुट्टी दिलेली नाही, मात्र उपस्थितीबद्दल आम्ही विचार करतोय की ५०-५०% वर उपस्थिती आणून कामकाज चालू ठेवता येईल का तो विचार करतोय मला खात्री आहे की जनतेला या विषयाचं गांभीर्य कळलेलं आहे, जसं पुण्यामध्ये काही जणांनी स्वतःहुन दुकानं बंद केलेली आहेत, मी मुंबईसह इतर सर्व शहरातल्या दुकानदारांना विनंती करतो.

 

की जीवनावश्यक वस्तूंचे दुकाने सोडून ज्याची रोज आवश्यकता लागत नाही अशी दुकाने स्वतःहून बंद ठेवली तर बरं होईल प्रायव्हेट लॅबमधील चाचण्या खूप महत्त्वाच्या असतात. केंद्र सरकारकडून त्याची परवानगी घ्यावी लागते. जे टेस्ट करण्याचे किट आहेत ते सरकारच्या माध्यमातून आपल्याकडे येत असतात कारण त्याचं प्रमाणीकरण करून ते किट येतात.

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: