झी मराठी वाहिनीवरील मिसेस मुख्यमंत्री ही मालिका प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडली आहे. ही मालिका प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी झाली आहे. त्यातील सुमी आणि समरचं या व्यक्तिरेखा प्रेक्षकांना त्यांच्यापैकीच एक वाटतात. पण आता या मालिकेतील अजून एक नवीन एंट्री झाली आहे.
या अभिनेत्रीला मालिकेत पाहून प्रेक्षकांना सुखद धक्काच बसला. हि अभिनेत्री म्हणजे हेमांगी कवी. हेमांगी कवी मिसेस मुख्यमंत्री मालिकेत धनश्री शिंदे नावाची व्यक्तिरेखा साकारतेय. कथानकात अचानक एंट्री झालेल्या धनश्रीचा काही उद्देश आहे कि खरंच ती जशी दिसते तशी साधीभोळी आहे हे प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळेल. एकीकडे सुमी आणि दुसरीकडे धनश्री या दोघी समरच्या आईसाहेबांच्या आयुष्यात काय उलथापालथ करणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
या व्यक्तिरेखेबद्दल बोलताना हेमांगी म्हणाली, “मिसेस मुख्यमंत्री सारख्या लोकप्रिय मालिकेत मी एक नवीन व्यक्तिरेखा साकारतेय आणि त्यासाठी पुन्हा एकदा छोट्या पडद्याकडे वळले याचा मला खूप आनंद आहे. मी खूप उत्सुक आहे प्रेक्षकांचा धनश्रीला कसा प्रतिसाद मिळतो हे जाणून घ्यायला. ही एक वेगळी भूमिका आहे जी मला पडद्यावर साकारताना खूप मजा येतेय त्यामुळे प्रेक्षकांना पण ती जरूर आवडेल अशी मी आशा करते.”
click and follow Indiaherald WhatsApp channel