राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांची पुन्हा एकदा ‘उत्कृष्ट संसदपटू’ म्हणून निवड करण्यात आली आहे. सतराव्या लोकसभेच्या पहिल्या सत्रात सर्वोत्कृष्ट संसदपटू म्हणून सुळे यांची निवड करण्यात आली आहे.

2019 मध्ये झालेल्या 17 व्या लोकसभेच्या निवडणुकीत सुळे यांनी बारामतीमधून विजय मिळवला होता. संसदेच्या पहिल्या सत्रांमध्ये सुळे यांनी 34 चर्चासत्रांत भाग घेतला. चार खासगी विधेयके मांडली. 147 प्रश्‍न उपस्थित केले आहेत.

पहिल्या सत्रांमध्ये खा. सुळे यांची संसदेतील उपस्थिती 100 टक्के राहिली आहे. गेल्या लोकसभेत सुळे यांनी 1181 प्रश्‍न विचारले होते, तर 22 खासगी विधेयके मांडली होती. 152 वेळा चर्चेत सहभाग नोंदवला होता. तसेच संसदेत 100 टक्के हजेरी लावली होती. गेल्या संसदेतमधील खासदारांची हजेरी 80 टक्के होती.                                                                                                                                                                                  

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: