केवळ स्वच्छताच नव्हे तर राज्यातील शहरांचे व्यक्तिमत्व आमुलाग्र बदलावे. मुंबईसारख्या जागतिक नकाशावरील महानगराचे केवळ काँक्रिटीकरण होऊ नये तर सौंदर्यीकरण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहायक आयुक्त, प्रभाग अधिकारी यांच्याशी संवाद साधला. मुंबईतील पदपथ सुंदर करण्यासाठी आयोजित प्रदर्शनास देखील त्यांनी भेट दिली.

 

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबई उपक्रमाअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांसंदर्भात आढावा बैठक आज सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी त्यांनी सहायक आयुक्तांशी संवाद साधला.

 

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, मुंबईतील रस्ते, पदपथ, वाहतूक बेटे, उद्याने, मनोरंजन मैदाने, मंडई, शालेय परिसर, आरोग्य, पाणी आदी विविध नागरी सेवा- सुविधा जागतिक दर्जाच्या करण्यासाठी प्रत्येकाने एक संघ म्हणून काम करावे. यासाठी मुंबईत असलेल्या विविध शासकीय यंत्रणांनी एकत्रितपणे समन्वय साधावा.
 
मुंबईत हवा प्रदुषणाबरोबरच दृष्यमानताही कमी होत आहे. यावर उपाय योजण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी महानगरपालिकेने जाहिरात फलक धोरण आखावे. तसेच अवैध व विना परवाने फलक लावून शहराचे सौंदर्य बिघडविणाऱ्यांविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करावी. अवैध फलकांना आळा घालण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांशी स्वतः संवाद साधू, असेही ठाकरे यांनी सांगितले.                                   

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: