पुणे – मागील काही दिवसांच्या प्रकारामुळे आपण त्रासलो असल्यामुळे आता डोक्यावरील फेटा उतरवून शेती करतो, असे वक्तव्य कीर्तनात वादग्रस्त वक्तव्य केल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी एका जाहीर कीर्तनात केले होते. भुमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी याबाबत बोलताना, कीर्तन करायचे की शेती, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण, महिलांबाबत त्यांनी अपमानास्पद बोलू नये, असे म्हटले आहे.
धर्मानुसार आणि पुराणानुसार आपला देश चालत नाही. तर संविधानानुसार तो चालतो. इंदुरीकर महाराजांनी कीर्तन करायचे की, शेती करायची हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण तरी इंदुरीकर महाराजांनी शेती करताना शेतात कामासाठी येणाऱ्या महिलांसोबत व्यवस्थित बोलावे. जर त्यांनाही अपमानास्पद बोलाल तर स्वतःच्या शेतातही काही दिवसांनी काम करता येणार नाही. अशी तुमची गत होऊ शकते, अशी टीका केली आहे. तसेच तुमच्याच प्रबोधनामुळे घडलेली लोक आपल्याला येणाऱ्या धमक्या आणि आपल्यावर होणारी अश्लील शेरेबाजी, हे करत असावीत, असा आरोपही त्यांनी केला आहे.
click and follow Indiaherald WhatsApp channel