मुंबई : कोरोना व्हायरस महाराष्ट्रातही धडकल्यानंतर राज्यातील नागरिकांनी त्याची धास्ती घेतली आहे. कोरोना व्हायरसचे पुण्यात 5 रुग्ण आढळल्यामुळे काळजी वाढली आहे. कोरोना व्हायरसचा अधिक प्रसार महाराष्ट्रात होऊ नये, यासाठी वर्क फ्रॉम होम म्हणजे घरूनच काम करण्याची मुभा द्यावी, अशी मागणी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.

 

पंकजा मुंडे या ट्विटमध्ये म्हणाल्या, कोरोना व्हायरसपासून बचावासाठी फक्त मास्क वापरणे आणि तापमानावर अवलंबून राहणे पुरेसे नाही. शक्य असल्यास लोकांना घरातूनच ऑफिसचे काम करण्याची मुभा द्यायला हवी, त्याचबरोबर परीक्षा वगळता शाळा आणि कॉलेजही बंद ठेवावेत, जेणेकरून कोरोना व्हायरस जास्त पसरणार नाही. कमी लोक घराबाहेर पडतील आणि परिस्थितीही योग्यरित्या हाताळता येईल.                                                                                                                                                                    

 

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: