व्हिवोने वाय सीरिजमधील आपला नवीन स्मार्टफोन व्हिवो वाय11 लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये 5000 mAh ची दमदार बॅटरी देण्यात आलेली आहे. हा फोन मिनरल ब्लू आणि ऐगट गेड रंगाच्या व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. 24 डिसेंबरपासून हा फोन विक्रीसाठी उपलब्ध असेल. या फोनची किंमत 8,990 रुपये आहे.

 

अमेझॉन, पेटीएम मॉल, टाटा क्लिक आणि बजाज ईएमआय ई-स्टोरवर 25 डिसेंबर तर फ्लिपकार्टवर 28 डिसेंबरपासून विक्री सुरू होईल. व्हिवो वाय11 मध्ये 6.5 इंच एचडी+ हालो फूलव्यू डिस्प्ले देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 12एनएम ऑक्टाकोर क्वॉलकम स्नॅपड्रॅगन 439 SoC प्रोसेसरवर चालतो. फोनमध्ये 3 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज मिळेल. फोनमध्ये अँड्राईड 9 वर बेस्ड व्हिवोचा कस्टमाइज्ड ऑपरेटिंग सिस्टम फनटच ओएस9 देण्यात आले आहे. याशिवाय फोनमध्ये फिंगरप्रिंट सेसर मिळेल.

 

कॅमेऱ्याबद्दल सांगायचे तर यात रिअर ड्यूअल कॅमेरा सेटअप मिळेल. यात 13 मेगापिक्सल मुख्य कॅमेरा आणि 2 मेगापिक्सल डेप्थ कॅमेरा मिळेल. सेल्फीसाठी फ्रंटला 8 मेगापिक्सल कॅमेरा आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात 4जी एलटीई, वाय-फाय, ब्लूटूथ v4.0, जीपीएस/ए-जीपीएस, मायक्रो यूएसबी, यूएसबी ओटीजी आणि 3.5 एमएम हेडफोन जॅक सारखे फीचर्स मिळतील. फोनमध्ये 5000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

 

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: