स्टोरेज डिव्हाईस कंपनी वेस्टर्न डिजिटलने भारतीय बाजारात आपला नवीन पोर्टेबल हार्ड ड्राइव्ह लाँच केली आहे. ही हार्ड ड्राइव्ह सहज तुमच्या हातात बसेल.
वेस्टर्न डिजिटलच्या या हार्ड ड्राइव्हला पासपोर्ट लाइन सीरिज अंतर्गत सादर करण्यात आलेले आहे आणि कंपनीने दावा केला आहे की 5टीबीच्या साइजमध्ये ही सर्वात पातळ हार्ड ड्राइव्ह आहे. कंपनीचा दावा आहे की, बाजारात उपलब्ध अन्य कंपनीच्या 5टीबी ड्राइव्हची साइज या हार्ड ड्राइव्हच्या तुलनेत 30 टक्के अधिक आहे. या ड्राइव्हमध्ये तुम्ही फोटोज, व्हिडीओ, म्यूझिक आणि डॉक्यूमेंट स्टोर करू शकता.
नवीन हार्ड ड्राइव्ह काळा, लाल आणि निळ्या रंगात मिळेल. सोबतच कंपनीने मॅकसाठी खास मिडनाइट ब्लू रंगाचे व्हेरिएंट देखील सादर केले आहे. ही हार्ड ड्राइव्ह केवळ 19.15 एमएम आहे. यात यूएसबी 3.0 कनेक्टर मिळेल. हे कनेक्टर यूएसबी 2.0 ला देखील सपोर्ट करते.
ड्राइव्हसोबत 3 वर्षांची वॉरंटी मिळेल. ड्राइव्हच्या सुरक्षेसाठी हाय एंक्रिप्शनचा वापर होतो. किंमतीबद्दल सांगायचे तर वेस्टर्न डिजिटलच्या 1टीबी व्हेरिएंटची किंमत 4,499 रुपये आणि 5टीबी व्हेरिएंटची किंमत 10,999 रुपये आहे.
click and follow Indiaherald WhatsApp channel