पुणे – राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी व महापुरामुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) येत्या रविवारी (दि.11) होणाऱ्या महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा पेपर 2 (राज्य कर निरीक्षक) ही परीक्षा पुढे ढकलली आहे. येत्या रविवारी होणारी “एमपीएससी’ची मुख्य ही परीक्षा 24 ऑगस्ट रोजी होणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

राज्यातील अतिवृष्टी आणि पूरपस्थितीमुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. विशेषत: कोल्हापूर आणि सांगली परिसराला महापुराने वेढले आहे. राज्यभरातील हजारो उमेदवार ही मुख्य परीक्षा देणार आहेत. मात्र, पूरपरिस्थितीत ही परीक्षा घेणे उमेदवारांसाठी गैरसोयीचे ठरणार असल्याने आयोगाने ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

आता 24 ऑगस्टला होणाऱ्या या परीक्षेसाठीची सुधारित प्रवेशपत्रे आयोगाच्या ऑनलाइन यंत्रणेद्वारे उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे आयोगाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: