सेलिब्रेटी ब्रँड वॅल्यूमध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली पहिल्या स्थानावर कायम आहे. तर अभिनेता अक्षय कुमारने अभिनेत्री दीपिका पादुकोणला मागे टाकले आहे. अक्षय कुमारची ब्रँड वॅल्यू वाढून 104.5 मिलियन डॉलर (740 कोटी रुपये) झाली आहे. यासोबतच त्याने सेलिब्रेटी ब्रँड वॅल्यू रँकिंगमध्ये दुसरे स्थान गाठले आहे. डफ आणि फेलेप्स सेलिब्रेटी रिपोर्ट 2019 नुसार, या रँकिंगमध्ये दीपिका एक स्थान घसरून तिसऱ्या स्थानावर आहे.
या यादीत पहिल्या स्थानावर कायम असलेल्या विराटची ब्रँड वॅल्यू 237.5 मिलियन डॉलर (जवळपास 1691 कोटी रुपये) आहे. तिसऱ्या स्थानावर असलेल्या दीपिकाची ब्रँड वॅल्यू 93.5 मिलियन डॉलर आहे. दीपिकासह रणवीर देखील तिसऱ्या स्थानावर आहे. रणवीरच्या क्रमांकात एका स्थानाने वाढ झाली असून, मागील वर्षी रणवीर चौथ्या स्थानावर होता.
66.1 मिलियन डॉलरसह सलमान खान 5व्या स्थानावर, 55.7 मिलियन डॉलरसह शाहरूख खान सहाव्या आणि 24.9 मिलियन डॉलर ब्रँड वॅल्यूसह अमीर खान 16व्या स्थानावर आहे. आलिया भट्ट, अमिताभ बच्चन, आयुष्मान खुराणा आणि डायगर श्रॉफ यांचा देखील टॉप – 20 मध्ये समावेश आहे.
click and follow Indiaherald WhatsApp channel