लिंबाचा वापर फक्त खाण्यासाठी नाही तर इतर गोष्टींसाठी देखील केला जातो. लिंबा मधून आपल्याला भरपूर प्रमाणात क जीवनसत्व मिळते. या क जीवनसत्वचा वापर आजारापासून बचाव करण्यासाठी होतो.तसेच  लिंबाचे बरेच घरगुती उपाय देखिल आहेत. ते जाणून घेऊया.

●   हिरड्यांमधून रक्त येत असेल तर लिंबाचा रस बोटावर घेऊन तो दात आणि हिरड्यांना चोळावा रक्त येणे बंद होते.

●   अपचन झाले असेल तर थंड पाण्यात लिंबू पिळून प्यावं. त्यामुळे अपचनाचा त्रास कमी होईल.

●   दररोज एका ग्लास मध्ये लिंबू पिळून प्यावे त्यामुळे पचन क्रिया सुधारते.

●   अंघोळीच्या पाण्यात लिबू पिळून त्या पाण्याने अंघोळ केल्यामुळे त्वचा मुलायम व चमकदार होते.

●   लिंबू नखांवर घासल्यास नखे मजबूत व तजेलदार होतात. तसेच नखे पांढरी शुभ्र देखील राहतील.

●   घरात येणाऱ्या मुंग्यांसाठी घालवण्यासाठी लिंबाचा वापर होतो. लिंबामुळे मुंग्यांची वास घेण्याची ताकत कमी होते.

●   स्वयंपाक घरातील भांड्यांना उग्र वास येत असल्यास त्यांना लिंबू घासून ठेवावे.त्यामुळे भांड्यांना वास येत नाही.

●   हाताला येणार कोणत्याही प्रकारचा वास जात नसेल तर हाताला लिंबू चोळावे.

●   कपड्याला गंज किंवा गरम इस्त्रीचे डाग लागले असतील तर त्या डागांवर लिंबू घासावे डाग कमी होतील.

●   केस तेलकट असतील तर त्यावर लिंबू चोळावे त्यामुळे केसला  चमक येते.


మరింత సమాచారం తెలుసుకోండి: