मुंबई : देशभरात कोरोना व्हायरसने माजवलेला हाहाकार काही थांबण्याच नाव घेत नाही. आज महाराष्ट्रातली कोरोनाग्रस्तांची संख्या 748 वर गेली आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत महाराष्ट्र नंबर एक वर आहे. मुंबईत 30 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच मुंबईत सर्वाधिक 458 रुग्ण आहेत.
राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या आतापर्यंत 748 झाली आहे. रविवारी, एका दिवसात 113 नवीन रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत 56 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
click and follow Indiaherald WhatsApp channel