स्विर्झलँडचा स्टार टेनिसपटू रोजर फेडरर आपल्या देशातील नागरिकांच्या मदतीसाठी पुढे आला आहे. त्याने कोरोनाशी लढण्यासाठी 1 मिलियन डॉलरपेक्षा अधिक रक्कम दान करणार असल्याचे सांगितले आहे. जागतिक महामारीच्या काळात आपण स्विर्झलँडसोबत असल्याचे त्याने सांगितले.

 

20 वेळा ग्रँड स्लॅम विजेता असलेल्या फेडरर आणि त्याची पत्नी मिर्काने एक मिलियन स्विस फ्रँक ( जवळपास 8 कोटी रुपये) दान केले आहेत.

 

फेडररने सोशल मीडियावर लिहिले की, ही सर्वांसाठीच कठीण वेळ आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कोणीच मागे राहू नये. मी आणि मिर्काने स्विर्झलँडमधील गरीब कुटुंबांसाठी 1 मिलियन स्विस फ्रँकची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

 

त्याने लिहिले की, आमचे योगदान ही केवळ सुरूवात आहे. आम्हाला आशा आहे की गरजू कुटुंबांच्या मदतीसाठी अनेकजण पुढे येतील. आपण सर्व मिळून या समस्येला दूर करू शकतो. दरम्यान, कोरोनाचे सर्वाधिक लागण झालेल्या देशांच्या यादीत स्विर्झलँड नववा देश आहे. येथे 8,800 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, सोमवारपर्यंत 86 जणांचा मृत्यू झाला होता.

 

https://mobile.twitter.com/rogerfederer/status/1242782285222612994/photo/1?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1242782285222612994&ref_url=https%3A%2F%2Fwww.majhapaper.com%2F2020%2F03%2F26%2Fodisha-to-set-up-the-largest-covid19-hospital-in-the-country-will-be-a-1000-bed%2F

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: