
क्रिकेट विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध भारत या सामन्यात भारताचा पराभव झाला. या पराभवाला जम्मू-काश्मिरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी भारतीय संघाच्या भगव्या जर्सीला जबाबदार ठरवलं आहे.
तुम्ही मला अंधश्रद्धाळू म्हणू शकता पण भारताला या भगव्या जर्सीनेच विजयापासून रोखलं आहे, असं ट्वीट मेहबूबा मुफ्ती यांनी केलं आहे.
इंग्लंडने भारतावर 31 धावांची मात करुन आठ सामन्यांमधला पाचवा विजय साजरा केला. या विश्वचषकात भारताचा पहिला पराभव आहे.
जर पाकिस्तान आणि इंग्लंडच्या जागी आपलं सेमिफायनलच तिकीट पणाला लागलं असतं. तेव्हाही भारतीय संघाने अशीच फलंदाजी असती का?, असा सवाल माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी उफस्थित केला आहे.