राज्यात विधानसभा निवडणुकीची तयारी सध्या जोरदार सुरु आहे. सर्वच राजकीय पक्ष सध्या वेगवेगळ्या पद्धतीने प्रचार करत आहेत. परंतु आघाडी आणि युतीचे जागावाटप अजून झालेले नाही त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. अशातचं आदित्य ठाकरे यांनी भाजप शिवसेना युतीबाबत भाष्य केले आहे.

आदित्य ठाकरे हे जनआशीर्वाद यात्रेनिमित्त सध्या कोकणात आहेत. यावेळी त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना ‘शिवसेना-भाजपच्या युतीमध्ये तिढा निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून बाहेर चर्चा सुरु आहेत. त्यावर युतीबाबत नेमकं ठरलं आहे. बाहेर कोण काय बोलत आहेत हे मला माहित नाही. शिवसेना-भाजपमध्ये जे इनकमिंग सुरु आहे, त्यावर आम्ही योग्य उमेदवार पारखून घेत आहोत. युतीत शिवसेना विश्वासघात करणार नाही असं विधान केले आहे.

तसेच पुढे बोलताना त्यांनी राज्यातील २८८ जागांची चाचपणी करणं हे दोन्ही पक्षाचं काम आहे. कारण दोघांची ताकद तपासणे गरजेचं आहे, त्यासाठी या आढावा बैठका घेतल्या जात आहेत असं विधान केले आहे. तसेच मी निवडणूक लढवण्यास सज्ज आहे. जनतेने आदेश दिला की निवडणूकही लढेन असंही आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती तुटली होती. जागावाटपाबाबत एकमत न झाल्याने दोनही पक्षांनी वेगवेगळी निवडणूक लढवली होती. त्यामुळे आताही युती नाही झाली तर दोनही पक्ष वेगवेगळे लढू शकतात.

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: