खासदार सुप्रिया सुळे यांनी बावडा गटातून उच्चांकी मतांनी निवडून आलेल्या पुणे जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्या अंकिता हर्षवर्धन पाटील यांची भेट घेतली. या निवडणुकीमध्ये विक्रमी मतांनी निवडून आल्याबद्दल (सोमवारी) नवी दिल्लीत त्यांनी अभिनंदन केले. भावी राजकीय वाटचालींबाबत शुभेच्छा देत चर्चा करण्यात आली.
या भेटीत खासदार सुप्रिया सुळे यांनाही हर्षवर्धन पाटील व अंकिता पाटील यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी कॉंग्रेसचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व खासदार सुपिया सुळे या नेत्यांची विविध विषयांवर चर्चा झाली.
click and follow Indiaherald WhatsApp channel