फार कमी काळात बॉलिवूडमध्ये आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री सारा अली खान सध्या आपल्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत असून चित्रपटाचे चित्रिकरण संपवून काही दिवसांपूर्वी सारा केरळला व्हेकेशनसाठी गेली होती. त्यानंतर ती आता फॅमिलीसोबत मालदीवमध्ये व्हेकेशन एन्जॉय करत आहे आणि तिने या दरम्यान सोशल मीडियावर या व्हेकेशनचे काही फोटो सुद्धा शेअर केले आहेत. पण नुकताच एक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. आतापर्यंतचा जो तिचा सर्वात बोल्ड बिकिनी फोटो मानला जात आहे.
मागच्या काही दिवसांपासून सारा अली खान मालदीव्समध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे. दरम्यान यावेळेचे तिने काही बिकिनी फोटो शेअर केले आहेत. तसेच स्विमिंग पुलमधील काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले. ती ज्यात भाऊ इब्राहिम खानसोबत दिसली होती. यावेळी रेड-यलो स्ट्रीप बिकिनी तिने घातली होती आणि तिने आपल्या इन्स्टाग्रामवर याच बिकिनीतील एक खूपच बोल्ड फोटो शेअर केला. सध्या सोशल मीडियावर साराचा हा हॉट फोटो खूप व्हायरल झाला आहे.
या फोटोंच्या कॅप्शनमध्ये साराने लिहिले, नेहमीच तुमचा मी आधार बनून उभी राहिन. सारा सध्या तिची आई अमृता सिंह आणि भाऊ इब्राहिमसोबत सुट्टी एन्जॉय करत आहे. तिने याआधीही भावासोबत बिकिनी फोटो शेअर केले होते. याशिवाय तिचे आणि अमृता सिंह यांचे काही फोटो व्हायरल झाले होते. या दोघीही जेट स्काइंग करताना ज्यात दिसल्या होत्या.
click and follow Indiaherald WhatsApp channel