मुंबई : कोल्हापूरचे पालकमंत्रीपद स्वीकारण्यास राज्याचे महसूल मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी नकार दिला आहे. आमच्यातील सहकारीच कोल्हापूरचे पालकमंत्रीपद स्वीकारेल, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितल्यामुळे राज्यमंत्री सतेज पाटील कोल्हापूरचे पालकमंत्री होणार का याबाबतची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. यासंदर्भातील वृत्त एबीपी माझा या वृत्त वाहिनीने दिले आहे.
दोन दिवसांपूर्वीच म्हणजेच 8 जानेवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री आणि राज्यमंत्री यांच्या पालकमंत्री म्हणून जिल्हानिहाय नियुक्त्या केल्या आहेत. यात पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर वगळता सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद राष्ट्रवादीकडे आहे. बाळासाहेब थोरात यांना या विषयी विचारला असता त्यांनी आपण कोल्हापूरचे पालकमंत्रीपद स्वीकारणार नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले की, 12 पालकमंत्रीपदाची आमची मागणी होती. पंरतु अकराच पालकमंत्री झाल्याने हा निर्णय घेतला आहे. कोल्हापूरचे पालकमंत्रीपद आमच्यातील सहकारी स्वीकारेल.
click and follow Indiaherald WhatsApp channel