राज्यातील हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशीही विरोधकांनी सरकारच्या विरोधात घोषणा देत शेतकऱ्यांना दिलेले अश्वासन पूर्ण करा अशी मागणी केली. तर अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावरील मुद्यांवर चर्चा केली. यावेळी उद्धव ठाकरेंनी विरोधकांना चांगलेचं खडेबोल सुनावले.

 

महाविकास आघाडीचे सरकार हे रिक्षा आहे, असे विरोधकांनी हिणवले. मात्र हो खरे आहे. महाविकास आघाडीचे सरकार हे गोरगरिबांची रिक्षा आहे. कारण ही रिक्षा परवडणारी आहे. त्यांना बुलेट ट्रेन परवडणारी नाही, अशा शब्दात ठाकरेंनी विरोधकांना उत्तर दिले. तर सुधीर नका होऊ अधीर, झालात तुम्ही बेकार, म्हणून अजब वाटते आमचे सरकार, असा टोलाही दुह्वा ठाकरेंनी सुधीर मुनगंटीवार यांना लगावला.

 

तर सावरकरांच्या मुद्यावरून वरूनही उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना काही प्रश्न विचारले. अखंड हिंदुस्थान जो सावरकरांना हवा आहे, तो का नाही करत ? असा सवाल विचारला. सावरकरांच गायीविषयीचं मत देवेंद्रजींना मान्य आहे का ? असा सवालही उद्धव ठाकरेंनी भर साभृहात भाजप आमदारांना विचारला.

 

गोहत्या बंदी संपूर्ण देशात का नाही राबवली गेली, असा कडवा सवाल ठाकरेंनी विचारला.आज भाजपचेचं काही नेते स्वतःच्या राज्यात गोहत्येवर बंदी आणण्यास तयार नाहीत. गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि रिजीजू काय म्हणाले होते ते आठवा, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला.

 

दरम्यान, कर्जमाफीसंदर्भात महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये तब्बल एक तास चर्चा झाली. या चर्चेनंतर कर्जमाफीबाबत निर्णय झाला की जाहीर करु, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: