ठाकरे सरकारचे खातेवाटप अखेर रविवारी जाहीर झाले. पसंतीची खाती न मिळाल्याने काही मंत्र्यांमध्ये नाराजी पसरली. मात्र सरकारच्या खातेवाटपावर विरोधकांनी टीका केली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी टीका केली आहे.

 

ते एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना बोलत होते. ते म्हणाले की, ‘या खातेवाटपात शरद पवारांनी अनेकांना चकवा दिला आहे. गृह खातं आमच्या विदर्भात अनिल देशमुखांना दिले तर छगन भुजबळांसारख्या ज्येष्ठ नेत्याला आणखी वजनदार खातं मिळेल अशी आम्हाला अपेक्षा होती, असे मुनगंटीवार म्हणाले.

 

पुढे बोलताना ते म्हणाले, ‘मुंगीला लाजवणारा आणि कासवने आत्महत्या करावी अशा मंद गतीचं हे सरकार आहे, असे ते म्हणाले. कोणी रुसतोय, कोणी फुगतोय, कोणी राजीनामा देतोय तर कोणी लोटांगण यात्रा काढतोय. या सरकारचा आधार किस्सा खुर्चीचा आहे. शिवसेनेनं तर मुख्यमंत्री पदासाठी पक्षाचा विचार जमिनीत गाडून टाकला आहे, असे मुनगंटीवार म्हणाले. दरम्यान, अजित पवार आमचे हितचिंतक हे अवघ्या महाराष्ट्राने पाहिलंय पण आता मात्र त्यांना दुसऱ्याच्या हितांची चिंता करावी लागेल यासाठी शुभेच्छा आहेत. त्यांच्या हातून चांगलं काम घडे, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.                                                                              

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: