बिग बॉस हा रिअलिटी शो नेहमी चर्चेत असतो. या शो च्या सीझनमध्ये प्रत्येकवेळी काही ना काही गोंधळ पहायला मिळतो. एक आठवड्यापूर्वी बीग बॉसचा 13 वा सिझन सुरु झाला आहे. मात्र या शो ला सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार विरोध दर्शविला जात आहे. त्यामुळे हा शो बंद होणार का? अशी चर्चा ऐकायला आता मिळत आहेत.
या सीझनच्या सुरुवातीलाच घरात एंट्री करणाऱ्या स्पर्धकांना सलमान खानने त्यांचा बीएफएफ (BFF) कोण असणार आहे हे सांगितलं होतं. या बीएफएफ (BFF) च्या संकल्पनेनुसार यावेळी एका वेळी एका बेडवर 2 व्यक्ती झोपणार आहेत. तर बिग बॉस 13 च्या सुरुवातीपासूनच मुलं आणि मुली एक बेड शेअर करत आहेत आणि प्रेक्षक बिग बॉसच्या या फॉरमॅटचा विरोध करत आहेत.
ट्विटरवर शुक्रवारच्या रात्रीपासून #UnsubscribeColoursTV, #Boycott_BigBoss, #JehadFelataBigBoss सारखे हॅशटॅग ट्रेंड होत आहेत. एवढंच नाही तर अनेकजण सलमान खानला ब्लॉक करुन त्याचा स्क्रिनशॉट सोशल मीडियावर शेअर करतना दिसत आहेत. त्यामुळे या विरोधानंतर बिग बॉसच्या फॉरमॅट मध्ये काही बदल होणार का? की हा शो बंद होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
बिग बॉस 13 बाबत भाजपा नेता सत्यदेव पचौरी यांनी नाराजीपूर्ण ट्वीट केलं आहे. त्यांनी लिहिलं, हे बिग बॉस नाही तर अय्याशी करणाऱ्यांचा हा अड्डा आहे. या शोला आमचा पूर्ण विरोध असून हा शो लवकरात लवकर बंद करावा. खरंतर मी यांचा अद्याप एकही एपिसोड पाहिलेला नाही. मात्र याबद्दल सगळीकडे बरंच काही बोललं जात आहे त्यातून माहिती मिळते. हे असे शो समाजात चुकीचा संदेश पोहोचवण्याचे काम करत आहे. त्यामुळे ते लगेचच बंद करण्यात यावेत.
click and follow Indiaherald WhatsApp channel