मुंबई : आपल्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असणाऱ्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी राज्यातील सर्व जनतेस मकर संक्रातीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन अमृता यांनी संक्रात आणि पंबाजमधील सांस्कृतिक लोहरी सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यापूर्वी शिवसेनेवर केलेल्या टीकेमुळे अमृता फडणवीस यांना ट्रोल करण्यात आलं होतं. तसेच, शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून त्यांच्यावर टीकाही करण्यात आली होती.
अमृता फडणवीस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दलच्या विधानावरुन चांगलेच शाब्दिक युद्ध रंगले होते. शिवसेनेच्या भाजपासोबतच्या काडीमोडनंतर, गेल्या काही दिवसांपासून अमृता फडणवीस ट्विटरवरुन वारंवार शिवसेना आणि ठाकरे कुटुंबाला लक्ष्य करताना दिसून आलं. वाईट नेता मिळणे ही महाराष्ट्राची चूक नाही, पण अशा नेत्यासोबत राहणे ही चूक आहे, असे म्हणत 'जागो महाराष्ट्र' अशी टिप्पणी करत अमृता यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं होतं.
अॅक्सिस बँकेतील खाती राष्ट्रीयकृत बँकेत वळवण्याच्या निर्णयावरून अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. त्यांच्या या टीकेला शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी यांनी सणसणीत उत्तर दिलं. 'महाराष्ट्राने काय करावे हे शिकवणे अॅक्सिस बँकेच्या कर्मचाऱ्याचं काम नाही' असं म्हणत अमृता फडणवीस यांना प्रियंका चतुर्वेदी यांनी टोला लगावला होता.
https://twitter.com/fadnavis_amruta/status/1217077487890362368/photo/1?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1217077487890362368&ref_url=https%3A%2F%2Famnews.live%2F
click and follow Indiaherald WhatsApp channel