स्मार्टफोन,स्मार्टवॉच, स्मार्टटिव्ही, स्मार्टबुटांनंतर आता बाजारात स्मार्ट शर्ट्स देखील आले आहेत. स्पेनची कंपनी सेपियाने असे शर्ट्स बाजारात आणले आहेत, जे परिधान करून तुम्ही तुमचा स्ट्रेस म्हणजेच तणाव कमी करू शकाल. एवढेच नाही तर या शर्टात अनेक खास गोष्टी आहेत. कंपनीने दावा केला आहे की, हे शर्ट घातल्याने रक्ताचा प्रवाह संतुलित ठेवण्याबरोबरच उर्जाचा स्तर वाढवते.
शर्टावर पडणार नाही डाग –
सेपिया मागील अनेक दिवसांपासून स्मार्ट शर्टवर काम करत आहे. कंपनीने नुकतेच थर्ड जनरेशन शर्ट लाँच केले आहे. म्हणजेच याआधी दोन स्मार्ट शर्ट बाजारात आलेले आहेत. पहिल्या जनरेशनच्या शर्टामध्ये कंपनीने अशा फॅब्रिकचा वापर केला होता, ज्यामुळे कॉलर आणि दुसरे भाग जास्त खराब होणार नाही. तर दुसऱ्या जनरेशनच्या शर्टात घामाचे डाग पडत नसे व वासही येत नसे.
या प्रकारे बनवले आहे शर्टाचे फॅब्रिक –
कंपनीचे म्हणणे आहे की, हे शर्ट बनवण्यासाठी एका खास प्रकारच्या फॅब्रिकचा वापर करण्यात आलेला आहे. सांगण्यात येते की हे फॅब्रिक बनवण्यासाठी त्यामध्ये बायोसेरामिक नॅनोपार्टिक्लस देखील टाकले जातात. दावा करण्यात येत आहे की, हे शर्ट सुर्याच्या किरणांपासून देखील बचाव करेल आणि फार इन्फ्रोरेड रेजला रिप्रोड्युस करेल. यामुळे शरीराला अधिक चांगल्याप्रकारे ऑक्सिजन मिळेल.
मेटाबॉलिज्म वाढवण्यास मदत –
सेपियाचे हे स्मार्ट शर्ट 3.0 मेटाबॉलिज्म वाढवण्यास देखील फायदेशीर आहे. कंपनीचे सीईओ फेड्रिको सेंज यांनी सांगितले की, आम्ही सुरूवातील आरामदायी कपडे शिवण्यास सुरूवात केली. मात्र नंतर फॅशनबरोबर आरोग्यासाठी फायदेशीर शर्ट बनवण्याचा निर्णय घेतला.
7000 रूपये शर्टाची किंमत –
या शर्टाची किंमत 98 डॉलर (6900 रूपये) ठेवण्यात आलेली आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, सर्वसाधारण शर्टापेक्षा हे शर्ट दुप्पट टिकेल.
click and follow Indiaherald WhatsApp channel