देवेंद्र फडणवीस सरकार हे स्वातंत्र्यानंतरच सर्वात भ्रष्ट सरकार आहे. गेल्या पाच वर्षात सर्वात भाजप सरकारने हजारो कोटींचे घोटाळे केले. असा घणाघात राष्ट्रवादीचे नेते अनिल गोटे यांनी केला आहे. मी जे बोलत आहे ते अगदी जबाबदारीने बोलत आहे. मी पुराव्याशिवाय काहीही बोलत नाही. असेही त्यांनी यावेळी सांगितले.
एबीपी माझा ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी भाजप आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे. गोटे म्हणाले, फडणवीस सरकारने समृद्धी महामार्गाच्या कामात भ्रष्टाचार केला. शिवस्मारकाच्या कामात हजारो कोटींचे घोटाळे केले. हे घोटाळे समोर आले तर अख्खा महाराष्ट्र भाजपला पायताणाने मारेल. भाजपकडे सर्वात जास्त पैसा आहे. म्हणून तर इतके घोटाळे करत आहे. असेही त्यांनी यावेळी संगीतले.
click and follow Indiaherald WhatsApp channel