मुंबई : राज्य सरकारने वैद्यकीय क्षेत्रातील सर्व रिक्त जागा महिनाभरात भरण्याचा निर्णय घेतला आहे. महत्त्वाचं म्हणजे कोणतीही परीक्षा न घेता, पूर्वीच्या शैक्षणिक पातळीवरील परीक्षांवरुन या जागा तातडीने भरल्या जातील, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.
सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभाग तसंच राज्यभरातील विविध महापालिका रुग्णालयांमध्ये जवळपास 30 हजार जागा रिक्त आहेत. या सर्व जागा महिना-दीड महिन्यात भरणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागात 17 हजार 337 जागा रिक्त आहेत. वैद्यकीय शिक्षण विभागात 11 हजार जागा रिक्त आहेत. राज्यातील महापालिका रुग्णालयांमध्ये हजारो जागा रिक्त आहेत. या सगळ्या जागा भरण्यास मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली आहे, असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, सर्व जागा आम्ही महिनाभरात शंभर टक्के जागा भरणार आहोत. त्यासाठी वेगळा विभाग तयार केला जात आहे. परीक्षा न घेता त्यांच्या जुन्या ज्या परीक्षा असतील जसे नर्सिंग कॉऊन्सिल, MBBS ची झालेली परीक्षा, पीजीचे मार्क असतील या आधारावर या जागा भरल्या जाणार आहेत, असंही राजेश टोपे म्हणाले आहेत.
click and follow Indiaherald WhatsApp channel