मुंबई : मुंबतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 4 हजार 870 वर पोहचली असल्याची माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे. दरम्यान आज मुंबईत कोरोनाचे 281 नवीन रुग्ण बाधित आढळून आले आहे.
तसेच दिवसभरात 12 जणांचा मृत्यू झाला असून मृत्यूमुखी पडणाऱ्या रुग्णांची संख्या 167 वर पोहचली आहे. दिलासा देणारी बाब म्हणजे आतापर्यंत 762 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसाच्या तुलनेत मुंबईत आज कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाली आहे.
मुंबईच्या धारावी परिसरात कोरोनाचा शिरकाव झाल्यानं मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. कारण धारावीसारख्या झोपडपट्टीत कोरोनाचा एकदा प्रसार होणं सुरू झाला तर त्याला आळा घालणं कठीण जाईल म्हणूनच आरोग्य विभागाकडून धारावीबाबत अधिक दक्षता घेतली जात आहे. घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करण्याचे काम प्रशासनाकडून सुरू करण्यात आलं आहे.
https://mobile.twitter.com/ANI/status/1254053033077616642?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1254053033077616642&ref_url=https%3A%2F%2Famnews.live%2F
click and follow Indiaherald WhatsApp channel