बुलडाणा : जिल्ह्यात कोरोना व्हायरसचे आणखी चार रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता 21 वर पोहचली आहे. हे चारही रुग्ण कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाच्या संपर्कात आले होते.
त्यावरून त्यांची तपासणी केली असता आज त्यांचा अहवाल हा पॉझिटिव्ह आहे आहे. यामध्ये बुलडाण्यात एक रुग्ण असून मलकापूरमधील 3 रुग्ण असल्याची माहिती मिळत आहे. याबाबतची माहिती जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी दिली आहे.
click and follow Indiaherald WhatsApp channel